Search This Blog

26 November 2009

कोयनानगर मधील पर्यटन स्थल़ाची विस्तृत माहिती...भाग १ ...














१. कोयना धरनाबद्दल थोडस........
महाबलेश्वर येथे उगम पावलेल्या कोयना नदीवर महाबलेश्वर पासून ६४ कि,मी. अंतरावर  देशमुखवाडी येथे कोयना धरण बांधण्यात आले. हे धरण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मार्गदर्शानाखाली १९६२ साली पूर्णत्वास आले. धरनाच्या जलसाटयाला
" शिवसागर जलाशय " असे नाव आहे. या पाण्यावर २००० मेगा व्याट  इतकी वीजनिर्मिती होत आहे. महाराष्ट्रासह  इतर राज्यात ही वीज वापरली जाते. त्याचबरोबर महाराष्ट्र, कर्नाटक, आन्ध्रप्रदेश या तिन्ही राज्यातील शेतजमिन सिंचानाखाली आणून शेती सुजलाम सुफलाम करण्यात आली. म्हणून कोयना धरनास "महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी"  संबोधले जाते.
२. नेहरू उद्यानाबद्दल थोड........
कोयनानगर पासून साधारण ३ की. मी. च्या अंतरावर नवजाच्या दिशेला स्वतंत्र भारताचे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक सुंदर उद्यान बनविण्यात आले ज्याचे भूमिपूजन स्वत: पंडितजिंनी केले होते. यामध्ये पंडितजिंच्या पंचतत्वांची जाणीव करून देणारा पंचधारा घुमट देखिल आहे. या उद्यानात विविध प्रकारची झाडे, वेली आणि मनमोहक फुले पर्यटकांच आकर्षण आहेत.लहान मुलाना खेळण्याकारिता येथे अद्यावत खेळनी देखिल आहेत. ज्यावर दिवसभर मुले खेलू शकतात. या उद्यानातुन कोयना धरनाची मागची बाजु पहावयास मिळते. नेहरू उद्यानात कोयना धरण, कोयना वीजनिर्मिती  प्रकल्पाची माहिती देणारी एक छानशी चित्रफीत सुद्धा दाखवन्यात येते त्यासाठी यशोगाथा केंद्र बनवलेले आहे.


३. ओझार्ड़े धबधबा :- 
कोयनानगर पासून नवजाच्या  दिशेला १० की. मी. अंतरवर सह्याद्रीच्या पर्वत रांगमाधुन साधारण ३०० ते ३५० मीटर उंचीवरून हा धबधबा कोसाळतो. दुधाप्रमाने फेसलानार पानी पर्यटकाना मोहत पाडत.या धबधाब्या खाली आंघोळ करण्यात एक वेगालीच मजा आहे. धबधब्याकडे जाताना ३०-४० मिनिटे घनदाट जंगलातून एक जंगल सफरीच आनद देखिल मिळतो. या धबधाब्यावर वीजनिर्मिती प्रकल्प करण्याच प्रयत्न चालू आहे. यामुले हा धबधबा उन्हाळ्यात सुद्धा पहावयास मिळेल. या धबधब्याकड़े जाताना रस्त्यात छोटे छोटे अनेक धबधबे व अथांग  असा पसरलेला शिवसागर जलाशय पहावयास मिळतो.