कोयनानगर ही कोयना धरनाच्या कामासाठी असणा-या अधिकारी, कर्मचारी यांना राहण्यासाठी तयार झालेली एक वसाहत आहे. तुम्ही जर नकाशा उघडून पाहिलात तर तुम्हाला कराड चिपलून रस्त्यावर कोयना नदी दिसेल पण कोयनानागर दिसणार नाही. तिथे तुम्हाला हेलवाक दिसेल. या हेलवाकच्या अलीकडे म्हणजे कराडच्या दिशेला २ ते ३ किलोमीटर वर कोयनानगर आहे.
कराड पासून साधारण ६० किलोमीटर वर तर चिपलून पासून साधारण ४० किलोमीटर कराड-चिपलूनरस्त्यावर कोयनानगर आहे.
कोयनानगर एक थंड हवेच ठिकाण म्हणून, एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
25 November 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment